Crime | अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर वारंवार अत्याचार; फलटणच्या तरुणावर वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल..!

 


सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

                  फलटण येथील युवकाचे बारामती तालुक्यातील एका युवतीसोबत २०१९ पासून असलेले शरीरसंबंधाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फलटण येथील २४ वर्षीय तरुणावर वडगाव निंबाळकर पोलिसात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव गौरव आदेश निंबाळकर (रा. फलटण, जि. सातारा) असे आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१९ ते मे २०२५ या कालावधीत फलटण (जि. सातारा) येथील आरोपीच्या घरा जवळील जुन्या पडक्या खोलीत, फलटण येथील लॉजमध्ये तसेच करंजेपुल (ता. बारामती, जि. पुणे) येथे आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केले.


पीडिता नोव्हेंबर २०१९ मध्ये मुधोजी हायस्कुल, फलटण येथे इयत्ता १० वी मध्ये शिकत असताना तिची आरोपी गौरव आदेश निंबाळकर यांच्याशी ओळख झाली. सुरुवातीला तो पीडितेशी बोलत होता. मात्र २०२० मध्ये आरोपीने पीडितेला वाईट भावनेने शरीसुखाची मागणी केली असता तिने नकार दिला. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ व त्रास देणे सुरू केले. “मी तुझ्या घरच्यांना तुझ्याबाबत काहीही सांगेन, बदनामी करीन” अशा धमक्या दिल्याने पीडितेने आरोपीशी फोनवर बोलणे बंद केले.


एकदा पीडिता घरी एकटी असताना आरोपीने घरात घुसून “तु माझ्याशी फोनवर बोल नाहीतर तुझ्या घरच्यांना आपले लफडे आहे असे सांगेन” अशी धमकी दिली. काही दिवसांनी आरोपीने पीडितेला फोन करून बोलावले, तिच्या उजव्या हाताला धरून आपल्या ताब्यातील काळ्या रंगाच्या एमटी/५० मोटारसायकलवर बसवून फलटण येथील लॉजवर नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध केले.


त्यावेळी आरोपीने मोबाईलमध्ये पीडितेचे उघडे फोटो, तसेच दोघांचे उघडे फोटो आणि व्हिडिओ काढले. “हा प्रकार घरी सांगितलास तर हे फोटो-व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करीन” अशी धमकी देऊन ब्लॅकमेल करत फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळोवेळी पीडितेशी जबरदस्तीने संबंध ठेवले.


यानंतर ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी करंजेपुल येथे पीडितेच्या घरी आला. “माझ्यासोबत लॉजवर चल नाहीतर मोबाईलमधील तुझे उघडे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीन” अशी धमकी देऊन हाताने मारहाण केली आणि “तुला सुखाने जगू देणार नाही” असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली.


या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसात आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments